पांगरी - बार्शी तालुक्यातील उस उत्पादक शेतकर्‍यांचे उस कारखान्याने नेऊन तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला.  अद्याप बिलाचे वाटप न झाल्यामुळे तालुक्यातील संतप्त शेतकर्‍यांनी खामगाव (ता.बार्शी) येथील कुमुदा-आर्यन साखर कारखान्यावर गोंधळ घालून कामगारांना काम बंद करण्यास भाग पाडले.
   खांमगाव येथील कुमुदा-आर्यन या खाजगी साखर कारखान्याने डिसेंबर मध्ये साखर हंगाम सुरू करून पांगरी,बावी,जळकोट,चिखर्डे,आदि गटातील शेतकर्‍यांचा उस गाळप केला.मात्र ऊस बिलासाठी शेतकर्‍यांना देंनंदिनच कारखान्यावर वेळ व आर्थिक फटका सहन करत पायपीट करावी लागत आहे.कुमुदा कारखान्यास मोठ्या विश्वासाने ऊस घातलेल्या शेतकर्‍यांच्या पदरी अनेक महीने उलटून जावूनही निराशाच आली आहे.उसाचे बिल मिळत नसल्यामुळे अनेक शेतक-यांचे प्रश्न तसेच राहिले आहेत.अगोदरच निसर्गाच्या द्रुस्टचक्रात सापडलेल्या व कर्जबाजारी  झालेल्या शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे व घामाचे ऊस बिल मिळत नसल्यामुळे अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे.
  ऊस बिलसाठी टाळाटाळ केली जात असल्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो शेतकर्‍यांनी कारखान्यावर बिलासाठी धाव घेतली.मात्र कारखान्यावर जनरल म्यानेजर गैरहजर असल्यामुळे शेतकर्‍यांनी गोंधळ घातला.कारखान्याच्या साखर गोडावूण मध्ये साखर शिल्लक नसल्यामुळे याबाबत शेतकरी यावेळी संभ्रमित होऊन बोलत होते.मुलीचे लग्न ऊसाच्या बिलावर ठरवले असून लग्न जवळ आल्याचे यावेळी शेतकरी काकुळतीला येऊन बोलत होते.जानेवारी ते मार्च दरम्यानचे एकही बिल शेतकर्‍यांना देण्यात आले नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.कारखाना प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असून वरिष्ठांनी याकडे लक्स केन्द्रित करून आम्हा शेतकर्‍यांना उसाचे बिल मिळवून द्यावे अशी मागणी हे शेतकरी करत आहेत.या महिना अखेरीस उसाचे बिल नं मिळाल्यास न्यायालयाचे दारावाजे ठोठावण्यात येईल असेही यावेळी शेतकर्‍यांनी सांगितले.यावेळी भारत बरबडे(रस्तापूर),दादराव फोपले(बावी),शंकर घोलप(महागाव)सूर्यकांत चव्हाण(जळकोट),गोरख गरड(तांदुळवाडी)दत्तात्रय मोरे(पानगाव) आदि शेकडो शेतकरी उपस्थित होते.
बालाजी मुळे(शेतकरी उक्कडगाव);  जानेवारीत ऊस कारखान्यास घातला आहे.मात्र चार महिन्याचा कालावधी उलटून जावूनही अद्याप उसाचे बिला नं मिळाल्यामुळे आम्हाला अनंत समस्या उद्भवत आहेत.
कारखाना प्रशासन: सर्व उसबिले टप्प्याटप्प्याने देण्यात येतील असे कारखाना प्रशासनाने यावेळी संगितले.
  

 
Top