उस्मानाबाद -  जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांचे मार्गदर्शनाखाली सन 2014-15 या आर्थीक वर्षामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यांनी 29.27 कोटी रुपयाची वसूली केली आहे. या यशाबद्दल आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी सर्वांचे कौतूक करुन अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
         यावेळी अपर जिल्हाधिकारी  जे.टी.पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी  श्रीरंग तांबे,उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उप विभागीय अधिकारी अभिमान्यू बोधवड, सचिन बारवकर,उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे, कोषागार अधिकारी राहूल कदम, जिल्हा पत्र सूचना अधिकारी श्री.कोडेंकर, तहसीलदार श्री.स्वामी, खनीज विभागाच्या तहसीलदार राजश्री मोरे, नायब तहसीलदार श्रीमती चौंडेकर, नाना कदम,चंद्रकांत शिंदे, श्री.खडबडे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. 
         जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून आणि  तलाठी यांचे अथक प्रयत्नामुळे वसूलीचा इष्टांकाची पूर्तता करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयानी जिल्ह्यासाठी 28.33 कोटीचा इष्ठांक दिला होता. प्रत्यक्षात इष्ठांकापैकी वसूली 29.97 टक्के इतकी झाली असून ती इष्ठांकाच्या 105.79 टक्के इतकी आहे. या कामगिरीबाबत औरंगाबाद विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दागट यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे याचे विशेष अभिनंदन केले.       

 
Top