बार्शी -  काशी पीठाच्या दहिवडकर मठाचे मठाधिपती गुरुसिध्देश्वर शिवाचार्य दहिवडकर महाराज यांचे विजापूर येथे अल्पशा आजारावर उपचार सुरु असतांना निधन झाले. बार्शीतील दहिवडकर बृहन्मठ येथे रविवारी सायंकाळी त्यांच्यावर धर्मपरंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी रंभापूरी पीठाचे जगद्गुरु शिवाचार्य, काशी पीठाचे जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य, दहिवडकर मठाचे उत्तराधिकारी विश्वेश्वर, धारेश्वरकर, होटगीकर, माढेकर, मानुरकर, मंद्रुपकर, औसेकर, चिडगुपेकर, अंबाजोगाईकर, वाईकर, शिरुरअनंतपाळकर, विरुपाक्ष मन्मथधाम, वाळवेकर, सिध्दनकेरीकर, गौडगावकर आदी शिवाचार्य उपस्थित होते.
बार्शीत त्यांचे पार्थीव आणल्यानंतर कर्नाटक व महाराष्ट्रभरातून आलेल्या भक्तांनी मोठी गर्दी केली. शहरातील प्रमुख मार्गावरुन त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी रंभापूरी व काशी पीठाच्या जगदगुरुंनी भक्तांना मार्गदर्शन केले.

 
Top