उस्मानाबाद - ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोट निवडणूक एप्रिल-2015  मध्ये नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची वेळ आता सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यत वाढवून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली  आहे.
          निवडणूक कार्यक्रमानुसार 31 मार्च ते 7‍एप्रिल या कालावधीत कार्यालयीन व कामकाजाच्या पाच दिवशी  वरील वेळेत सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत नामनिर्देशनपत्र संबधित ठिकाणी स्वीकारण्यात येतील. चालू निवडणूक कार्यक्रमानुसार  जिल्ह्यात  ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणूकांची संख्या लक्षणीय असल्याने तसेच ग्राम विकास विभागाच्या 26 मार्च,2015 च्या राजपत्रात  प्रसिध्द झालेल्या सुधारणेनुसार, नामनिर्देशनपत्र स्वीकारतांना जात वैधता प्रमाणपत्र  नसल्यास हमीपत्रासह नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहे. 
यावेळी  नामनिर्देशनपत्रे भरण्याच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याने निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधीत वाढवून देण्याचा प्रस्ताव आयोगाच्या विचाराधीन होता. ग्रामपंचायतीच्या उक्त निवडणूक कार्यक्रमानुसार बुधवार दि.1‍एप्रिल ते मंगळवार, दि. 7‍एप्रिल      (दि.2,3 व 5 एप्रिल हे सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून) नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे पत्रकात  नमुद करण्यात आले आहे.        
 
Top