उस्मानाबाद -: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबादच्या वतीने पदवीधारकांसाठी उस्मानाबाद येथे प्रशिक्षण कार्यक्रम दि. 20 ते 24 एप्रिल या कालावधीत आयोजित  करण्यात आला आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात पदवीधारकांसाठी नावीन्यपूर्व उपक्रम घेतले जातील. यात आयोजकांच्या कामाचे महत्वसिध्द करण्यात येईल. व्यक्तीमत्व विकास, संवाद कौशल्य, देहबोल, सुसूत्रता, सुत्रसंचालन, इव्हेंन्‍ट मॅनेजमेंट, व्यासपीठ, सजावट, कात्रणसेवा, डाक्युमेंटेशन, व्यवसाय मार्गदर्शन, कार्यक्रमाचे आयोजन, अद्योजकांचे व्यवस्थापन, अकाउन्ट,आभार प्रदर्शन आदि  विषयावर तज्ञ अधिकारी वर्गाकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही तिन्ही शाखेचे पदवीधर, एम बी. ए, एम. एस. डब्लयु, 18 ते 50 वयोगटातील उमेदवारांस प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहिती, प्रवेश, अर्जासाठी कार्यक्रम आयोजक सौ.अर्चना जगताप मो.नं. 7875569400 व सुशांत गायकवाड, मे.नं 9403866242 यांच्याशी एमसीईडी व्दारा जिल्हा उद्योग केंद्र मध्यवर्ती  इमारतीसमोर,उस्मानाबाद येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एमसीईडी व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे. 
 
Top