''प्रेम म्‍हणजे प्रेम असतं 
            तुमचं आमचं आगदी सेम असतं. 
   या काव्‍य ओळी प्रत्‍येकाच्‍या प्रेमाला एका सारख्‍यापणाच्‍या अनामिक सीमारेषेवर आणून ठेवतात. आणि मग दुस-याच्‍या प्रेमातले अनूभव प्रसंग किंवा घटना या आपल्‍याही प्रेमेच्‍या काळात आपल्‍या बाबतीतही घडल्‍या होत्‍या की! असे वाटायला लागते. मग अलगद आणि हळुवारपणे आपण त्‍या तरल प्रेम अनूभवांना न्‍याहाळत, गोंजारत स्‍वत:ला आपल्‍या प्रेम विश्‍वात नकळतपणे हरवून घेतो. 
        सतीश टोणगे यांच्‍या ''प्रेम हे असचं असतं'' या ललित संग्रहाला वाचताना त्‍यातील अनेक प्रसंग घटना या आपल्‍या प्रेमानूभवांची उजळणी आहे की, काय? असचं वाटायला लागते. पुस्‍तकातील प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना जपत जपत प्रेमातील हळुवार भावना कशा जपतात ते सहज सुलभ भाषेत सतीश टोणगे यांनी सांगण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.
      खरं तर सतीश टोणगे यांच्‍या मुळपिंड हा शोध पत्रका‍रितेचा आहे. प‍त्रकारिता सांभाळत त्‍यांनी नवतरूणांतील भावस्थितंतरे वृत्‍तपत्रातील अनेक सदरांमधून मांडलेली आहेत. हे करत असताना त्‍यांनी नवतरूणांच्‍या मुक्‍त भावनांना अलगद स्‍पर्शिले आहेत. त्‍यांच्‍या लेखनात कुठेच अतिशयोक्‍ती दिसून येत नाही. 
    सतीश टोणगे यांच्‍या ''प्रेम हे असंच असतं'' या ललित संग्रहात एकुण आठ्ठावीस ललित लेखांचा समावेश केलेला आहे. ज्‍यामध्‍ये 'सिर्फ तुम', 'कट्टयावरचे प्रेम', 'आठवणीतले प्रेम', 'अजूनही वाट पाहतोय', 'प्रेम हे असचं असते', 'पहिलं प्रेम', 'अनोळखी प्रेम', 'माझे मन तीचे झाले', 'तू गप्‍प का', 'निरोप घेताना'' यासह इतरही ललित लेख आहेत. प्रेमातील आपलेपणाचा ओलावा कसा टिकवता येतो ते 'सिर्फ तुम' या या ललितातून व्‍यक्‍त होते. तर तिच्‍यामुळे या ललितातली संगीता तिच्‍याशी असणा-या निर्मळ मैत्रीला जपण्‍यासाठी केलेला जाणीवपूर्वक अट्टाहास आणि संगीता प्रतिची कृतज्ञता खूप काही सांगून जाते.प्रत्‍येक ललित लेखात आपल्‍या जीवनाशी निगडीत प्रेमानूभवाची अनूभूती असल्‍याचे वाटायला लागते. ते वाचकाच्‍या अंतर्मनाला बिलगते हे सतीश टोणगेंच्‍या लेखनाचे वैशिष्‍ट आहे. प्रेमात वाहत जाण्‍यापेक्षा स्‍वताचे आत्‍मभान ठेवावे आणि सामाजिक जाणीवेशी स्‍वत:ची नाळ कायम ठेवावी हा मंत्र त्‍यांच्‍या ललितातून मिळतो. तसेच प्रेमभंग झाला म्‍हणून प्रेयसीवर न चिडता किंवा स्‍वत: खचून न जाता येणा-या परिस्थितीला सामोरे जात प्रेमाला अंतर्मनात कसं फुलवाव? हे सतीश टोणगेंच्‍या ''प्रेम हे असचं असतं'' मधून पहावयास मिळत आहे. एकुणच हा ललित संग्रह नवतरूणांना आपल्‍याच प्रेमकथेचा आरसा आहे. असेच वाटणारा आहे. त्‍यामुळेच की काय हे पुस्‍तक प्रेम करणा-यांनीच घ्‍यावे असे अवर्जुन म्हटले आहे. तरूणाईला हा ललित संग्रह भावल्‍यावाचून राहणार नाही. यात शंकाच नाही! 
     पुसतकाचे मुखपृष्‍ठ मांडणी आणि सजावट दिपक जाधव यांनी अतिशय आकर्षक केली आहे. पुस्‍तकास दै. एकमतचे संपादक पांडूरंग कोळगे यांची प्रास्‍तावना लाभली असून त्‍यात अनंत अडसुळ आणि शिवाजी कांबळे यांच्‍या सदिच्‍छा संदेशांचा समावेश केला आहे. पुस्‍तकाची किंमत 100 रूपये इतकी असून इंडो एन्‍टरप्राईजेस या प्रकाशन संस्‍थेमार्फत ते प्रकाशित केले आहे. एकुण वाचक 'प्रेम हे असचं असतं' या ललित संग्रहाचं स्‍वागत करतील अशी मनोभावे इच्‍छा व्‍यक्‍त करतो.
   स्‍वागत पुस्‍तकाचे 
प्रेम हे असंच असतं......
तारूण्‍य म्‍हणजे आयुष्‍यातील म्‍हत्‍वाचा टप्‍पा . या वयातच स्‍वत;ची एक वेगळी ओळख निर्माण होत असते.याच वयात स्‍वप्‍न पहायली जातात,प्रेम ही होतेआणि प्रेम भंग ही होतो.पण हे सगळे का घडते , याचा अर्थ मात्र उमगत नाही;अभ्‍यासाबरोबर प्रेमही फुलते तर एकतर्फी प्रेमातनू जिवन संपवावे ही वाटते. या व यासारख्‍या असंख्‍य प्रेमाच्‍या भावना सतीश टोणगे यांनी प्रेम हे असचं असतं, या पुस्‍तकातून व्‍यक्‍त केल्‍या आहेत. हे वाचताना अरेच्‍या... ही तर माझीच प्रेमकथा असे वाटते. हे पुस्‍तक नक्‍कीच वाचण्‍यासारखे आहे. 
पुस्‍तक परिक्षण - विशाल वाघमारे 




 
Top