नळदुर्ग - शहापूर ता. तुळजापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्‍या चेअरमनपदी कॉग्रेसचे जाधव शाहूराज मुरलिधर  यांची फेरनिवड बिनविरोध करण्‍यात आली. तर व्‍हाईस चेअरमन म्‍हणुन सौ. कदम चंद्रकला  कोंडीबा यांची निवड करण्‍यात आ‍ली. 
          तुळजापूर तालुक्‍यातील शहापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची नुकतीच निवडणुक घेण्‍यात आली. 13 
जागेसाठी झालेल्‍या निवडणुकीत पुढील प्रमाणे विजयी उमेदवार आहेत. पवार विजय नरसिंग, काळे नितीन सुभाष, 
नवाडे युवराज नरसा, मारे भाऊसाहेब गणपती, साळुंके व्‍यंकट विश्वभंर, सौ. पाटील सुमन दिलिप, श्री. सोमवसे परमेश्वर दत्‍तात्रय, पाटील जितेंद्र सुर्यकांत, डावरे संभाजी गणपती, होळकर लक्ष्‍मण नरसिंग, काळे सोपान राम, कदम चंद्रकला  कोंडीबा , जाधव शाहूराज मुरलिधर  इत्‍यादी. चेअरमनपदी निवड झाल्‍याबद्दल जाधव शाहुराज याना जिल्‍हा बॅकेचे संचालक तथा तुळजापुर तालुक्‍याचे युवा नेते सुनिलराव चव्‍हाण यानी अभिनंदन केले. तर माजी सरपंच धन्‍यकुमार जाधव , माजी उपसंरपच भास्‍कर सुरवसे , अशोक मोरे , प्रदीप जोशी , विजय पवार , बालाजी काळे,यांच्‍यासह अनेकानी सत्‍कार करून अभिनंदन केले आहे.  

 
Top