उस्मानाबाद - मिटकॉन व राज्य अन्न प्रक्रिया अभियान संचालनालय, मुंबई पुरस्कृत सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांसाठी उस्मानाबाद येथे अन्न प्रक्रीया उदयोगावर आधारीत प्रशिक्षण दि. 9 ते 16 एप्रिल या कालावधित आयोजित करण्यात आले आहे.
          या प्रशिक्षणात युवक युवतींना उद्योगधंदयात मदत करणाऱ्या शासकीय, निमशासकीय संस्था व त्यांच्या कर्ज योजनेची माहिती, उद्योजकीय गुण, उद्योगाबदल माहिती, बाजारपेठेचे व्यवस्थापन, व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल तयार करणे, बाजारपेठेचे व्यवस्थापन विक्री तंत्रज्ञान तसेच या क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार असून प्रशिक्षण पुर्ण केलेल्यांना प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात येणार आहे.
             स्वत:चा उद्योग/ व्यवसाय सुरु करु इच्छिणा-या 20 ते 35 वयोगटातील  युवक, युवती व महिलांनी अधिक माहितीसाठी आर. के. शेख (मो.-9028344270) मिटकॉन द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद संपर्क साधुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन  व्ही. टी. चव्हाण (मो. 9423171340) मुख्य प्रशिक्षक मिटकॉन, उस्मानाबाद यांनी पत्रकाव्दारे केले आहे.     

 
Top