उस्‍मानाबाद -  तुळजापूर विधानसभा मतदार संघातील उस्‍मानाबाद तालुक्‍यातील आनंदवाडी, भंडारवाडी, डकवाडी या गावातील पाणी परिस्थिती व दुष्‍काळी परिस्थितीच्‍या आढावा घेण्‍यासाठी आमदार मधुकरराव चव्‍हाण यांनी दौरा केला. त्‍यावेळी त्‍यांच्‍यासोबत जि.प. अध्‍यक्ष अॅड. धीरज पाटील, उपाध्‍यक्ष सुधाकर गुंड, तालुकाध्‍यक्ष लक्ष्‍मण सरडे, अल्‍पसंख्‍यांक जिल्‍हा उपाध्‍यक्ष मेहराज शेख उपस्थित होते.

      आंगदवाडी गावातील ग्रामस्‍थांशी संवाद साधला. त्‍यावेळी 1967 पासून आंगदवाडी हे गाव वसले असून आजतागायत त्‍या गावात राहणा-या ग्रामस्‍थांच्‍या जागेची नोंद (मालकी हक्‍क) नसल्‍याचे उघडकीस आले. यावेळी पंचायत समिती सहाय्यक बी.डी.ओ. गुप्‍ता व ग्रामसेवक यांना आमदार यांनी  सुचना देवून भोगवाट्यात नावे घ्‍यावी व रितसर प्रस्‍ताव सादर करून कायदेशीर कार्यवाही करून कबाला द्यावा अशा सुचना दिल्‍या. तर भंडारवाडी गावातील 2515 अंतर्गत रस्‍त्‍यांचा लोकार्पन सोहळा संपन्‍न झाला. गावागावातील पिण्‍याच्‍या पाण्‍याचे दुर्भिक्ष लक्षात घेवून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून पिण्‍यासाठी पाणी व मजुरांना काम उपलब्‍ध करून द्यावे असे अवाहन आ. चव्‍हाण यांनी केले. दुष्‍काळाची तीव्रता 1972 च्‍या दुष्‍काळापेक्षाही जास्‍त असून गावकर्त्‍यांना प्रशासनाकडे आवश्‍यक ते प्रस्‍ताव सादर करावेत आपण स्‍वत: त्‍याचा पाठपुरावा करून दुष्‍काळात जनतेबरोबर राहुन दुष्‍काळावर मात करू असे सुतोवाच केले. शेती उद्योग अडचणीत आला असला तरी कॉंग्रेस पक्ष आपल्‍यासोबत आहे.  केंद्रातील व राज्‍यातील सरकारने झोपेचे सोंग घेतले असले तरी आम्‍ही त्‍यांना स्‍वस्‍त बसू देणार नाहीत. त्‍यांच्‍याकडून आवश्‍यक ती कामे करून घेवू असेही त्‍यांनी सांगितले. डकवाडी येथील अगस्‍ती ऋषीमंदिर परिसरात तिर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत रू. 10 लक्ष चा निधी दिला असून फक्‍त निवास संरक्षक भिंतीच्‍या कामाचे भुमीपुजन आ. चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी अशोक शिंदे, चंदू सुरवसे, नवनाथ मोहिते, विजय पाटील, बालाजी मुळे, पोपट खांडेकर, गोविंद हारकर, विष्‍णु चौरे, अतिक वाघमारे, अकबर शेख, सुभाष हिंगमिरे, दयानंद केसकर, काका पांचाळ, लालासाहेब डक आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 
   कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय पाटील यांनी केले तर आभार नवनाथ मोहिते यांनी मानले.   

 
Top