बार्शी - बार्शी नगरपरिषदेच्या स्थापनेला दिडशे वर्षे पूर्ण होत असल्याने यंदाचे वर्ष हे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. नागरिकांकडून वसूल करण्यात येणार्‍या विविध कराच्या रकमेचा यंदा विक्रम झाला असून जिल्ह्यातील विक्रमी १२ कोटी रुपयांची करवसूली करणारी बार्शीनगरपरिषदेचे चांगले नाव झाले असल्याची माहिती पालिकेच्या कर वसूली विभागाचे महादेव बोकेफोडे यांनी दिली.
न्यायालयीन वादातीत प्रकरणे, शासनाच्या मालकीच्या जागांची येणे सोडल्यास सुमारे ९२% वसूली करण्यात आली आहे. तर येणे रकमेपैकी ८० % करवसूली पालिकेने वसूल केली आहे. मागील वर्षीच्या सन २०१३-१४ च्या आर्थिक वर्षात पालिकेने ९ कोटी ५० लाखाची करवसूली केली तर यावर्षीच्या पंचवार्षिक कर आकारणीचा फायदा पालिकेला झाला असून सन २०१४-१५ च्या आर्थिक वर्षातील करवसूलीच्या अंदाजे १५ कोटीच्या उद्दीष्टांपैकी १२ कोटीपर्यंत वसूल करण्यात पालिकेच्या कर्मचार्‍यांना यश मिळाले आहे. वेळेवर कर न भरणा करणार्‍या करदात्यांकडून शास्तीची ७० लाख रुपये पालिकेने वसूल केल्याने अतिरिक्त उत्पन्नात भर पडली आहे.
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, जिल्हा प्रशासन अधिकारी डेंगळे पाटील, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, उपमुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली घरपट्टी व कर आकारणी विभाग प्रमुख शरद कुलकर्णी, महादेव बोकेफोडे, नागेश लामतुरे, डॉ.गोदेपुरे, बामणकर, शिरपूरकर, शब्बीर वस्ताद, सी.बी.हुलसुरे, करळे, राजभोज, बागवान, शेखर मारुडा, बापू सोनवणे, दत्तात्रय चव्हाण, सुनिल कानडे, इटकर, गोजवाड, आनंद कांबळे, जनार्दन आदमाने, इलाईस मोमीण, अंकुश कांबळे, सचिन पवार, विशाल सकट, सुनिता बुगडे यांनी शहरातील करवसूलीची मोहिम यशस्वीपणे राबविली.

 
Top