उस्मानाबाद - सुर्योदय परिवार व जिल्हा शिवसेना उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने  पक्षांना पाणी पिण्यासाठी पाच हजार मातीच्या पात्राचे वाटप करण्यात आले.
        मंगळवार दि.२१ एप्रिल २०१५ रोजी श्रीपतराव भोसले हायस्‍कुलच्‍या  प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य कार्यक्रमात पक्षांना पाणी पिण्यासाठी सुमारे ५ हजार माती पात्राच्या भांड्याचे वाटप करण्यात आले. राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांचे वडील वैâ.विश्वासराव देशमुख (बापू) यांच्या प्रथम पुण्यस्म्रती दिनानिमित्त आज हे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थीसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक आर.बी.जाधव, के.पी.पाटील, प्रमोद कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उष्णतेचे तीव्र चटके जाणवत असून पशुपक्षांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. या पशु-पक्षांना पाणी मिळावे या उद्देशाने या मातीपात्राचे वाटप करण्यात आले असून गेल्यावर्षीही सुर्योदय परिवाराच्यावतीने मातीपात्राचे वाटप करण्यात आले होते. भोसले हायस्वूâलमधील साधरणतः ५ ते ६ हजार मुलांना या मातीपात्राचे वाटप करण्यात आल्यामुळे पशु-पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली. सदर कार्यक्रमासाठी युवा सेनेचे जिल्हाधिकारी सुरज साळुंके, शिवसेनेचे न.प.तील गटनेते सोमनाथ गुरव, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख प्रदिप साळुंके, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ घोडके, पप्पु मुंडे, पांडूरंग भोसले, शेषेराव उंबरे, विजय काकडे, धनंजय जाधव, धनंजय मुंडे,किशोर कोरके, पंकज पाटील, श्रीराम देशमुख, स्वप्नील पाटील आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top