कळंब -  कळंबच्या तहसिलदार वैशाली पाटील यांनी गैरमार्गाने मिळविलेल्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी कळंबच्या उपविभागीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या चौकशीचा अहवाल प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळंबच्या तहसिलदाराविरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिल्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्‍यानी आपले
उपोषण मागे घेतले आहे.
      याबाबतची अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील शेतरस्ते गेल्या दोन वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहेत. असे असतानाही नविन सिमेंट नाला बांधकामास परवानगी देण्यात येते. मुळात पुर्वीची मंजूर कामे अर्धवट अवस्थेत असताना पुन्हा नव्या कामांना का मंजूरी देण्यात येते, तसेच कळंबच्या तहसिलदार जनतेच्या सेवक म्हणून काम न करता हुकूमशहा प्रमाणे वागत असून त्या कार्यकत्र्यांना अपमाणीत करीत असतात, त्यामुळे गेल्या दोन वर्षातील कळंब तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामाची चौकशी व्हावी तसेच तहसिलद वैशाली पाटील यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यात येवून त्यांच्या विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात यावी यासाठी कळंब तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकत्र्यांनी काल दिनांक २१ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले होते.
दरम्यान उपोषणाच्या आज दुस-या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी तांबे यांनी नायब तहसिलदार एन. टी. भंडारे यांना सदर उपोषणार्थीची भेट घेण्यास सांगितले. यानंतर भंडारे यांनी उपोषण स्थळास भेट देवून कार्यकत्र्यांची भेट घेतली. आपण दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली असून कळंब तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची चौकशी करण्यासाठी कळंब येथील उपविभागीय अधिकाNयांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा अहवाल येताच या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. असे लेखी आश्वासन दिले.  हे लेखी आश्वासन दिल्यानंतर नायब तहसिलदार यांच्या हस्तेच त्यांना जूस देण्यात आला व हा ज्यूस पिवून उपोषणास बसणारे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भारत सागळे, विजय कवडे, युवराज पिंगळे, गजानन चोंदे, अरुण जाधवर, आश्रुबा बिक्कड, रत्नाकर उबाळे, जिव्हेव्हर कुचेकर, विकास वायसे, पांडूरंग डुकरे, भय्या निरफळ, बाळासाहेब जाधवर व प्रदीप यादव या सर्वपक्षीय कार्यकत्र्र्यांनी आपले उपोषण मागे घेतले
 
Top