पांगरी (गणेश गोडसे) शिक्षण क्षेत्रातील वाढती जीवघेणी स्पर्धा,शिक्षणाचे वाढते बाजारीकरण,व त्यातून काळानुसार विद्यार्थी मिळवण्यासाठी सुरू असलेली शाळांची धडपड. आपल्या मुलांना आमच्याच शाळेत घाला,आमचीच शाळा गुणवत्तापूर्वक आहे,आदि विविध प्रलोभने,विनंत्या पालकांना सुरू असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात सगळीकडेच दिसून येत आहे.मात्र योग्य शाळा निवडताना मात्र पालकांची मोठी दमछाक होताना दिसत आहे.यातून कसा मार्ग काढावा हा मोठा प्रश्न सध्या मुलांच्या पालकासमोर आहे.
           नवीन शाळांनाचे पेव: इंग्रजी शिक्षण व शाळांचे वेड शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पोचू लागले असून ग्रामीण भागातही दिवसेंदिवस नवीन इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे लोन पोचू लागले आहे.खेड्या पाड्यात,वाड्या वस्त्यावरसुद्धा इंग्रजी शाळा सुरू करण्याचे धाडस संस्था चालक दाखवू लागले आहेत.गतवर्षी अथवा त्यापूर्वी  सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आदर्श समोर ठेऊन दिवसेंदिवस नव नवीन शाळामद्धे भर पडत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची उपलब्धता करण्यासाठी संस्थापक शिक्षकावर बंधने घालताना दिसत आहेत.प्रत्येक शिक्षकाने किमान मुले आपल्या शाळेत कशी प्रवेश करतील यासाठी प्रयत्न करावे असे फर्मानच शाळा चालकांनी काढले आहेत.त्यात दिवसागणिक नवीन शाळा सुरू होत असल्यामुळे विद्यार्थी कसे मिळवायचे या भ्रांतेत शिक्षक दिसून येत आहेत.
     अनुदानित शाळा अडचणीत: प्रती दिन परिसरात कुठे ना कुठे तरी नवीन इंग्रजी शाळेची भर पडून अनुदानित शाळामधील पट संख्या कमी होत असल्यामुळे शाळा व वर्ग कसे टिकवायचे या चिंतेत शाळा चालक व शिक्षक दिसत आहेत.विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकांची संख्या घटून तुकड्या बंद होण्याचा धोका आहे.त्यामुळे किमान आपन अतिरिक्त ठरू नये व नौकरी टिकावी,गावाबाहेर जाण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी शिक्षकही दारोदार फिरून पालकांना विनंती करून किमान आमच्या नौकारीसाठी तरी मुलाला आमच्या शाळेत पाठवा,आम्ही पुरेपूर काळजी घेऊ अशी विनवणी करताना दिसत आहेत.शाळेचा गणवेश,शाळेत जाण्यासाठि वाहन आदि सुविधा आम्ही आमच्या पगारातून मोफत पुरवू अशी आमिशेही दाखवली जात आहेत.त्यामुळे शिक्षणाचे बाजारीकरण कश्या प्रकारे झाले आहे याचा साक्षात्कार होतो॰
     दर्जेदार शिक्षणाची हमी देत अनेक मातब्बर शिक्षण क्षेत्रात प्रवेश करताना दिसत आहेत.आम्हीच शिक्षणाचे वारसदार असून विद्यार्थी आम्हीच घडवू शकतो असा आशावाद दाखवला जात आहे.नातेवाइकांनी आपले विद्यार्थी दुसर्‍या शाळेत घालू नयेत यासाठी पुरेपूर बांधणी केली जात आहे॰
  नामाकीत शाळाही विद्यार्थ्यांच्या दारोदार फिरताना दिसत आहेत.नवीन निर्माण झालेल्या शाळांचे ठीक आहे मात्र अनेक नामांकित शाळांचे प्रतींनिधीही घरोघर फिरू लागले आहेत.

 
Top