उस्मानाबाद -  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धिरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड यांनी जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी माझा तालुका माझा उपक्रम तसेच वाचन लेखन व गणित विकसन उपक्रमाच्या माध्यमातून शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी  मार्गदर्शन केले. सर्व ‍मुख्याध्यापक, शिक्षक व पर्यवेक्षक व अधिकाऱ्यानी शाळेचा दर्जा सुधारण्याबाबत केलेले कार्य कौतूकास्पद असल्याचे  जिल्हा रिषादेचे अध्यक्ष  धिरज पाटील यांनी नमूद केले.
          जि.प. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, उस्मानाबाद यांनी विविध उपक्रम राबवले पर्यवेक्षीय यंत्रणा उभी करुन शाळा भेटी व मार्गदर्शन केले. विदयार्थी व शाळेच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. या उपक्रमांतर्गत सन 2014-15 वर्षात जिल्ह्यातील 37 शाळांनी अ श्रेणी प्राप्त केली व 434 शाळा ब श्रेणीत तर उर्वरीत 619 शाळा क श्रेणीत  आल्या आहेत. गतवर्षापेक्षा अ व ब श्रेणीतील शाळांच्या संख्या मोठी वाढ झाली आहे. 
          सन  2012-13 मध्य अ श्रेणीत 4 शाळा, अ श्रेणीत 64 शाळा ब श्रेणीत, क श्रेणीत 940, क श्रेणीत तर 85 शाळा ड श्रेणीत असे एकुण 1 हजार 93 शाळा होत्या. सन 2013-14 मध्ये अ श्रेणीत 7 शाळा, ब श्रेणीत 124 शाळा, क श्रेणीत 934 शाळा ड श्रेणीत 27 शाळांचा समावेश होता. 
           मुल्यांकनाच्या कार्यक्रमानुसार 1 जानेवारी ते 20 फेबुवारी,2015 या दरम्यान सर्व जिल्हा परिषद शाळांचे 200 गुणांचे मुल्यांकन करण्यात येते. या मुल्यांकनानुसार तालुक्यातून पहिल्या तीन शाळांना अनुक्रमे रुपये 5 हजार, 3 हजार व रुपये 2 हजार एवढी रक्कम बक्षिस स्वरुपात देण्यात येते. तसेच जिल्ह्यातील पहिल्या तीन शाळंना अनुक्रमे रुपये 10 हजार , साडेसात हजार रुपये पाच हजार रोख रक्कम बक्षिस स्वरुपात देण्यात येणार असून हा  खर्च जिल्हा परीषदेच्या सेस योजनेतून करण्यात येत असल्याची  माहिती शिक्षणाधिकारी (प्रा). यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.   

 
Top