बार्शी  - चोर्‍या करणारे म्हणून पोलिस संशयाच्या पहिल्या क्रमांकात आजपर्यंत अनेक अशिक्षित, मागास प्रवर्गातील व्यक्तींकडे पाहिले जात होते परंतु आता उच्चभू्र समाजातील व्यक्ती देखिल चोर्‍या करतांना रंगेहात पकडले जाऊ लागल्याने चुकीचा समज खोडला जात आहे. बार्शीतील एकाची दुचाकी चोरी करुन गावाबाहेर नंबरप्लेट फोडून वाहनाची विल्हेवाट लावतांना एका उच्चभू्र समाजातील चोरट्याला पकडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
     
याबाबत मिळालेली  माहिती अशी की , आनंद चंद्रकांत वाळवे (वय 30 , रा. उपळाई ठो.) असे उच्‍चभ्रु कुटूंबातील दुचाकी चोरटयाचे नाव आहे. सोमवारी दि.17 रोजी   ऐनापूर मारूती रस्‍त्‍यावरील चहाविक्रेते संतोष फिसके हे कुर्डूवाडी रस्‍त्‍यावरील स्‍टेट बँक ऑफ इंडियामध्‍ये आर्थिक व्‍यतहारासाठी गेले होते. बाहेर आल्‍यानंतर त्‍यांची दुचाकी जागेवर नव्‍हती.सदरचा प्रकार त्‍यांनी बँकेच्‍या संबधीत कर्मचा-याना सांगितले.  मात्र संबंधितानी उडवाउडवीचे उत्‍तर दिले .फिस्‍के यांनी दुचाकी चोरीची पोलिसात तक्रार दिली.येथेही त्‍यांना दुचाकी शोधण्‍यास सांगुन दुचाकी नाही सापडल्‍यास गुन्‍हा दाखल करू असे सांगण्‍यात आले.   फिस्‍के यानी आपले वाहन शोधत आसताना उपळाई रस्‍त्‍यावरील एका गॅरेज जवळ चोरटा फिस्‍के यांच्‍या वाहनाच्‍या नंबर प्‍लेट तोडत तसेच वाहनाची ओळख नष्‍ट करत असलयाचे दिसुन आले. यावेळी फिस्‍के व अन्‍य एकाने चोरटयाला रंगेहात पकडून पोलिसाच्‍या ताब्‍यात दिले.  आणले . यावेळी व्‍यापारी आणि नागरिकानी मोठी गर्दी केली.

 
Top