तुळजापूर (सुधीर सुपनार) -: बारुळ (ता. तुळजापूर) येथील दहा युवक शेतक-यांनी एकत्र येवून भवानी शंकर अॅग्रो प्रोडयुसर या शेतकरी गटाचे कंपनीत रुपांतर केले. याच गटातील शिवाजी नवगिरे या शेतक-याने एक कमी खर्चाचे स्‍प्रीकलर व एक टाकाऊ बाटल्‍यापासून स्‍प्रीकलर बनवून कमी खर्चात कशी शेती करावी, याचा उत्‍तम नमुना तरुणांसमोर ठेवला आहे. 
          याची दखल घेत तालुका कृषी अधिकारी संजय जाधव व आत्‍मा विभाग यांच्‍या सहकार्याने पुणे येथे पार पडत  असलेल्‍या राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शनात प्रगतशील शेतकरी शिवाजी नवगिरे यांना सन्‍मानित करण्‍यात आले आहे. नाशिकचे पोलीस आयुक्‍त पी. जगनाथन व युथ आयकॉन बाळासाहेब दराडे यांच्‍या हस्‍ते नवगिरे यांना हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.
      त्‍यांच्‍या या यशाबद्दल गटाचे अध्‍यक्ष सुनिल नवगिरे, धनंजय पवार, रतन मुदगुडे, बाबा वट्टे, चंद्रकांत ठोंबरे, संतोष कडबाने, गणेश चादरे, अमोल रणदिवे, सुधीर सुपनार आदींनी अभिनंदन केले आहे.
 
Top