उस्मानाबाद :- मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य बिभीषण जाधव हे दि. 20 मे पासून उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे..
दि. 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता तडवल (ता.जि. उस्मानाबाद) येथे रेल्वेस्टेशनची पाहणी करणार, त्यानंतर संबंधित अधिका-यांसमवेत बैठक. दुपारी 3.30 वाजता उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक. त्यानंतर उस्मानाबादहून नळदुर्ग येथे प्रस्थान. दि. 21 मे रोजी दुपारी 12.30 वाजता लातूर रेल्वे स्टेशनची पाहणी करुन संबंधित अधिका-यासोबत बैठक. त्यानंतर लातूरहून नळदुर्गकडे प्रस्थान. नळदुर्ग शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.

दि. 22 मे रोजी दुपारी 12 वाजता अक्कलकोट रोड स्टेशन, कडप गाव स्टेशनची पाहणी, संबंधित अधिका-यांसोबत बैठक. रात्री अक्लकोट येथे विश्राम.  दि. 23 मे रोजी सकाळी अकरा वाजता गुलबर्गा स्टेशन व घनगापूर स्टेशनची पाहणी, नंतर संबंधित अधिका-यांसोबत बैठक. गुलबर्गाहून अक्कलकोट येथे प्रस्थान. रात्री अक्कलकोट येथे विश्राम. दि. 24 मे रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर मंडळ रेल्वे प्रबंधक यांच्यासोबत डिविजनच्याविषयी बैठक, त्यानंतर सोलापूरहून अक्कलकोट येथे रवाना. दुपारी 3.30 वाजता अक्कलकोट रोड, स्टेशन तुळजापूर रेल्वे लाईन च्या संबंधी बैठक. नंतर अक्कलकोटहून सोलापूरकडे प्रस्थान. रात्री सोलापूर येथे विश्राम. दि. 25 मे रोजी दुपारी 12.30 वाजता कुर्डवाडी स्टेशनची पाहणी करुन संबंधित अधिका-यांसोबत बैठक. त्यानंतर कुर्डुवाडीहून पुण्याकडे प्रस्थान करतील.
 
Top