नळदुर्ग :- भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून पालावरच्या संस्कार केंद्रातील कार्यकर्त्यांचा तीन दिवसीय अभ्यास वर्ग नूतन मराठी विदयालयात संपन्न झाला. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, हिंगोली,
कल्याण, मुंबई, जालना, पुणे जिल्हयात वंचित दुर्लक्षित अशा भटके विमुक्त वस्त्यांमध्ये पालावरचे संस्कार केंद्र चालतात.
अभ्यास वर्गाचे उदघाटन महाराष्ट्र होमिओपॅथिक कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. विलास हरपाळे, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, पुणे येथील शिक्षणतज्ज्ञ धनंजय विचारे, पालावरचे शाळेचे प्रमुख उमाकांत मिटकर यांनी केले.
अंधश्रध्दा, अज्ञान यामुळे भटके विमुक्तांच्या आरोग्याच्या समस्या आहेत. हा विचार करुन संघटनेने प्रत्येक वस्तीत आरोग्य त्रि जोडून त्यांना प्रथमोपचार पेटी दिली आहे. याप्रसंगी डॉ. अभय शहापूरकर यांनी आजार कशामुळे होतात? आजार होवू नये व घ्यावयाची काळजी, व्यसनाधीता, औषधांची माहिती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. धनंजय विचारे यांनी मुलांना शिकवताना संवाद कौशल्य, चित्रकथा, खेळ, गाणी याद्वारे मुलांना गोडी निर्माण करणे, शैक्षणिक साहित्य, शाळेचे वेळापत्रक याविषयी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला.
रावसाहेब कुलकर्णी यांनी सर्व प्रशिक्षणर्थ्यांना येणा-या समसस्या, त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन केले. यमगरवाडीतील मुख्याध्यापक विठठल म्हेत्रे यांनी भटके विमुक्तातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काय प्रत्यन करावेत याची माहिती दिली. परिषदेचे कार्यवाह नरसिंग झरे यांनी संस्कार केंद्राच्या माध्यमातून वस्तीचा सर्वांगिण विकास कसा करता येतो याचे मार्गदर्शन केले.
अभ्यास वर्गाच्या समारोप प्रसंगी पालावरच्या शाळचे प्रमुख उमाकांत मिटकर यांनी समाजात काम करताना प्रश्न येणारच, आपण त्यांना सकारात्मक पाहून उत्तर शोधावे. सजगपणे काम करावे असे मनोगत व्यक्त केले. सदरील अभ्यास वर्गात महाराष्ट्रातील आठ जिल्हयातून 46 प्रतिनिधी उपस्थित होते. वर्ग यशस्वी करण्यासाठी दत्ता भोजने, तुकाराम माने, शालिवाहन वाघमोडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शेखर पाटील यांनी केले. या अभ्यास वर्गास सोलापूर शहरातील निलेश कोंडावार, अतिश शहा, आकाश शिर्ते, विकास पांढरे, नुतन मराठी विदयालयाचे मुख्याध्यापक सिध्दार्थ तडसरे, प्रकाश सिंगण, उमाताई सिंगण, राजेश पटवर्धन, आनंद वेळणे, संतोष शिर्के, प्रा. वामन बावळे, नंदकुमार परदेशी आदींनी भेट दिली.
 
Top