नळदुर्ग (प्रतिनिधी)  सामाजिक कार्यातुन   समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य अभिनय कलेपेक्षाही श्रेष्ठ  असल्याचे मत फॉरनेची पाटलीन फेम सिनेअभिनेता गिरीष परदेशी यांनी नळदुर्ग येथे  व्यक्त केले.
 सिनेअभिनेते गिरीश परदेशी यांनी कामधेनू बहुउददेशीय सामाजिक संस्थेस सदिच्छा भेट देवून संस्थेच्यावतीने सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती जाणून घेतली. यावेळी व्यासपीठावर कामधेनू संस्थेचे सचिव बळीराम जेठे, अभिनेते गिरीश परदेशी, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नाईक, विनायक अहंकारी आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्यावतीने बळीराम जेठे, शिवाजी नाईक यांनी अभिनेते परेदशी यांचे स्वागत केले.
कामधेनू ही सामाजिक संस्था महिलांच्या आरोग्यासंदर्भात पुरुषाबरोबर  काम करीत असून त्याचबरोबर परिसरातील एकल महिला, विधवा महिला तसेच तरुण वयात येणा-या मुलांच्या लैंगिक समस्याबाबत शंका निरासनाचे कार्य करीत आहे, सध्या तुळजापूर तालुक्यातील अनेक गावात संस्थेचे कार्यकर्ते काम  करीत आहे.
यावेळी पुढे बोलताना गिरीष परदेशी म्हणाले, कलावंतापेक्षा सामाजिक कार्यकर्त्याचे सामाजिक काम खूप मोठे आहे.  मी सुध्दा सामाजिक काम करण्यास उत्सुक आहे. कामधेनू  संस्थेचे कार्य   ऐकल्याप्रमाणे खरोखरच कौतुकास्पद आहे , यापुढे सामाजिक कार्यात  सहभाग घेवून काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त करुन भविष्यात या संस्थेस सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी  दिले.
       यावेळी संस्थेशी संलग्न असलेल्या कार्यकर्त्या महानंदा चव्हाण, सारिका कोरे, कार्यकर्ते प्रभाकर जाधव, सतीश ननवरे, संतोष सोनवणे, संतोष जाधव, बाबाजी मिसाळ, सतिश माडजे, नितीन जाधव, जयराम कांबळे आदीजण उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक संस्थेचे सचिव बळीराम जेठे यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते विनायक अहंकारी यांनी मानले.
फोटो :- सिनेअभिनेते गिरीश परदेशी यांचे   स्वागत करताना सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नाईक, विनायक अहंकारी शेजारी संस्थेचे सचिव बळीराम जेठे, महानंदा चव्हाण  आदि
 
Top