📯 *नळदुर्ग नगरपालिका निवडणुक अपडेट* 📢
---------------------------------------------------------

*नळदुर्ग नगराध्यक्ष पदासाठी ११ जणांनी १६, तर नगरसेवक पदासाठी ७८ जणांनी ११९ उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.*

🔸 नगराध्यक्ष पदासाठी रेखा हरिदास जगदाळेे (राष्ट्रवादी कांग्रेस),सुफीयाबेगम सज्जाद अली जाहगीरदार (कांग्रेस),भुमकर संध्याताई सुभाष (भाजप),मंदाकीणी दिलीप कुलकर्णी (भाजप),विमलबाई निवृत्ती काळे (शिवसेना),शेख रजिया बी मक्सूद (एआयएमआय़एम),कुरेशी मुन्वर सुल्ताना निसार (भाजप),शिला किसन दासकर (अपक्ष),बेबी पद्माकर घोडके (अपक्ष),आशा अशोक जगदाळे (अपक्ष) व राठोड सुब्राबाई शिवाजी (अपक्ष) या ११ उमेदवारांचे १६ अर्ज दाखल झाले आहेत.

*नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :-*

🔸प्रभाग १ मधून काँग्रेसच्या झिमाबाई राठोड, माणिक राठोड, राष्ट्रवादीकडून छमाबाई राठोड, निरंजन राठोड, भाजपच्या राणुबाई पवार व अजय पवार यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

🔸 प्रभाग २ मधून काँग्रेसकडून राखी गायकवाड, शब्बीर सय्यद, राष्ट्रवादीकडून भारती बनसोडे, उदय जगदाळे, भाजपाकडून इस्माईल शेख, शिवसेनेकडून विद्या वाघमारे, कमलाकर चव्हाण व एमआयएमकडून खाजापाशा शेख.

🔸 प्रभाग ३ मधून काँग्रेसकडून समदानी कुरेशी, विद्या मुळे, राष्ट्रवादीकडून नितीन कासार, सुमन जाधव, भाजपाकडून पद्माकर घोडके, गुंडुबाई चौधरी, शिवसेनेकडून संतोष पुदाले.

🔸प्रभाग ४ मधून काँग्रेसकडून मंगल सुरवसे, बसवराज धरणे, राष्ट्रवादीकडून सुनंदा जाधव, संजय बताले, भाजपाकडून महानंदा बारुळकर, प्रमोद कुलकर्णी, शिवसेनेकडून अनिता गुरव, मल्लिनाथ कांबळे, एमआयएमकडून नसीम शेख.

🔸 प्रभाग ५ मधून काँग्रेसकडून फक्रोद्दीन मुजावर, सुफियाबेगम मासूलदार, तर राष्ट्रवादीकडून महालिंग स्वामी, असिफाबेगम काझी, भाजपाकडून सादिक बागवान, महानंदा गायकवाड, एमआयएमकडून अ. सलीम बागवान.

🔸 प्रभाग ६ मधून काँग्रेसकडून शहबाज काझी, मन्नाबी कुरेशी, राष्ट्रवादीकडून दौलतबी पल्लीवाले, शब्बीर कुरेशी, भाजपाकडून मुनव्वर सुलताना कुरेशी, जिंदावली शेख, एमआयएमकडून फातिमा कुरेशी, रशीद शेख.

🔸 प्रभाग ७ मधून काँग्रेसकडून नय्यरपाशा जहागीरदार, सुफिया कुरेशी, राष्ट्रवादीकडून अमिनाबी इनामदार, मुश्ताक कुरेशी, भाजपाकडून स्वाती मुळे, सादिक जहागीरदार, एमआयएमचे शबाना कुरेशी, खालेद बागवान.

🔸 प्रभाग ८ मधून काँग्रेसचे मारुती खारवे, वर्षा डुकरे व अमिनाबी शेख, राष्ट्रवादीकडून दयानंद बनसोडे, अंबुबाई दासकर, शाहीन मासूलदार, भाजपाकडून सबुबाई राठोड, उल्कावती वाघमारे, एमआयएमकडून महेमुदा कुरेशी आदींनी फॉर्म भरले आहेत.

याशिवाय अपक्ष म्हणून प्रभाग २ मधून कैलास चव्हाण, आनंद पवार, सचिन शिंदे, रियाज बेग, प्रभाग ३ मधून नवलकुमार जाधव, प्रभाग ५ मधून शंकर पुदाले, विलास पुदाले, असिफाकाझी, सुफिया मासूलदार, प्रभाग ६ मधून मुन्नाबी कुरेशी, सुनंदा गायकवाड, प्रभाग ७ मधून फातेमाबी इनामदार, मुनीर कुरेशी, प्रभाग ८ मधून योगेश बनसोडे, सचिन बनसोडे, लता नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
 
Top