तुळजापूर :  ‘देड लाख रूपये जमा करो और छोकरी को ले जाओ’ हा फिल्‍मी डायलॉग नसून तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणा-या एका परराज्‍यातील 19 वर्षीय मुलीचे दीड लाख रूपयासाठी अपहरण करून त्‍या मुलीच्‍या भावाला 0770992238 या मोबाईल क्रमांकावरून हा वरील संदेश आला. त्‍यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी तुळजापूर पोलिसांत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
           पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तुळजापूरच्‍या श्री तुळजाभवानी मंदिर संस्‍थान संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात 19 वर्षीय परराज्‍यातील युवती इटीसीच्‍या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. सायंकाळी उशिरापर्यंत वस्‍तीगृहावर न परतल्‍याने वसतीगृहाच्‍या प्रशासन अधिकारी अर्चना देशमुख यानी पोलीसात तक्रार दिली. रात्री त्‍या मुलीच्‍या भावाला 0770992238 या मोबाईल क्रमांकावरून एक संदेश आला. ‘देड लाख रूपये जमा करो और छोकरी को ले जाओ’, असा संदेश आल्‍याने याप्रकरणी सदर तरूणीच्‍या भावाने तुळजापूर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्‍यानुसार पोलिसानी या घटनेची नोंद घेतले असून या मोबाईल क्रमांकाचा पोलीस तपास घेत आहेत.
 
Top