सोलापूर -: राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. बबनराव पाचपुते हे दि.२९ ऑक्‍टोबर सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत आहेत. त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 
             सोमवार दि २९ ऑक्टोबर रोजी. सकाळी ११ वाजता काष्टी ता. श्रीगोदा येथून शासकीय मोटारीने पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहावर येतील व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणा-या श्री गुरु आझरेकर माऊली यांच्या सत्कार समारंभास (स्थळ - संतश्रेष्ठ तनपुरे महाराज मठ )  उपस्थित राहून सोयीनुसार पंढरपूर येथून काष्टी कडे प्रयाण करतील.
 
Top