उस्मानाबाद -: मटका नावाचा जुगार खेळत असताना पोलीसाच्या विशेष पथकाने दि. ५ नोव्हेंबर रोजी विविध ठिकाणी मारलेल्या धाडीत सुमारे बारा हजार रूपयाचा मुद्देमाल पोलीसानी हस्तगत केला असून याप्रकरणी आठजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी, उमरगा, कळंब तालुक्यात पोलीसानी अचानक छापा मारून मटका नावाचा जुगार खेळत असताना रंगेहाथ पकडून ११ हजार ८३० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. मोहंमदअली बाबु तांबोळी (वय २७ वर्षे), बाळासाहेब शिवराम कवडे (वय ३७ वर्षे), सुरेश शंकर चव्हाण (वय २५ वर्षे), आय्या श्रीरंग शिंदे (वय ४२ वर्षे) (सर्व रा. इंदापूर, ता. वाशी) हे सर्वजण वाशी येथील वाशी ते इंदापूर जाणारे रोडलगत लिंबराज चेडे यांच्या पानटपरीमागे कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असताना पोलीसांनी अचानक छापा मारून त्यांच्याकडून सुमारे ८ हजार २८० रूपये हस्तगत केले, त्याचबरोबर अभिजित फुलचंद्र जाधव (वय 23 वर्षे), संतोष इराप्पा कुंभार (दोघे रा. दाळींब, ता. तुळजापूर) हे येळी (ता. तुळजापूर) येथील बालाजी हॉटेल समोर मुंबई मटका नावाचा जुगार खेळत असताना पोलीसानी छापा मारून त्यांच्याकडून २ हजार ४९० रूपये तर मुस्ताफा उस्मान सय्यद (वय 45 वर्षे, रा. धारूर, ता. कळंब) याच्याकडून ३४० रूपये, सुनिल भिमराव क्षिरसागर (रा. ईटकुर, ता. कळंब) याच्याकडून ७५० रूपये असे मिळून सुमारे ११ हजार ८३० हजार रूपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. याप्रकरणी वरील आठजणांविरूद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
* पोलीसांच्या धाडीत १ हजार ३५० रूपयाची अवैध दारू जप्त
उस्मानाबाद -: पोलीसानी कळंब तालुक्यातील हावरगाव येथे दि. ५ नोव्हेंबर रोजी अचानक छापा मारून सुमारे १ हजार ३५० रूपयाची अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अशोक महादेव शिंदे (वय ६५ वर्षे), राहुल लिंबराज कोकाटे (वय १९ वर्षे) (दोघे रा. हावरगाव, ता. कळंब) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहेत. पोलीसानी अचानक छापा मारून वरील दोघांकडील सुमारे १ हजार ३५० रूपयाची अवैध दारूची जप्ती केली. याप्रकरणी दोघांविरूद्ध कळंब पोलीसांत दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* गायरान जमीन अतिक्रमणाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत तिघे जखमी
नळदुर्ग -" येडोळा (ता. तुळजापूर) येथे गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाणीत तिघे जखमी झाल्याची घटना दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू विठ्ठल जाधव (वय ४१ वर्षे), धोंडुसिंग भगवानसिंग परिहार (वय ३५ वर्षे), अमोल बाबुराव जाधव (वय २५ वर्षे) (सर्व रा. येडोळा, ता. तुळजापूर) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहेत. तर सुब्राबाई शिवाजी राठोड, टिपू खेनू पवार, रवी धोंडीबा राठोड (सर्व रा. येडोळा, ता. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नावे आहेत. यातील तिघां आरोपीनी संगनमत करून येडोळा येथील सरकारी गायरान जमिनी अतिक्रमाच्या भांडण्याच्या कारणावरून तिघांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काठ्याने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद राजु जाधव यानी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिल्यावरून वरील तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास हवालदार सुहास गवळी हे करीत आहेत.
* ट्रकची मोटारसायकला धडक; एक जखमी
तुळजापूर -: भरधाव वेगाने येणा-या ट्रकने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ५ नोव्हेंबर रोजी सिंदफळ शिवारातील तुळजापूर ते सोलापूर रोडवरील बार्शी चोकात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
मंगेश दत्ता जानकर (वय २० वर्षे, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर) असे अपघातात जखमी झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. यातील दत्ता जनकर हे मोटारसायकल (क्र. एमव्हीपी २१०४) वरून स्वार होवून जात असताना समोरून येणा-या भरधाव ट्रक (क्र. जी.जे. २ झेड ८५७७) ने जोराची धडक दिल्याने त्यात दत्ता जनकर हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दत्ता जनकर यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूद्ध तुळजापूर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
* ट्रकची पिकअप जीपला धडक; एक ठार
अंबी -: भरधाव वेगाने येणा-या ट्रकने पिकअप जीपला पाठीमागून जोराची धडक देवून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना घडली. ही घटना दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास भूम ते खर्डा जाणा-या रोडवरील नळीफाटा येथे घडली.
कोणताबाई आत्माराव गरड (वय ६० वर्षे, रा.सावरगाव, पाथ्रुड, ता. भूम) असे अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. भूम ते खर्डा रोडवर नळीफाटा येथे भरधाव वेगाने येणा-या ट्रक (केए ३२ ए ७५७७) च्या चालकाने ट्रक निष्काळजीपणाने व हयगयीने चालवून पिकअप जीप क्रमांक एमएच १७ टी ६४४८ यास पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात जीपमधील कोणताबाई गरड ह्या गंभीर जखमी होऊन मरण पावल्या, या अपघातात पिकअप जीपचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याची फिर्याद पोपट आत्माराव यादव यांनी दिल्यावरून ट्रकचालकाविरूद्ध अंबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत हे करीत आहेत.
* विद्युत मोटारीची चोरी केलेल्या अज्ञात चोरटयांविरूद्ध गुन्ह्याची नोंद
उमरगा -: गुंजोटी (ता. उमरगा) येथे विद्युत मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री दहा ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडली.
गुंजोटी येथील पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणा-या जकापुर मध्यम प्रकल्प येथील विद्युत मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या मोटारीची किंमत सुमारे २८ हजार रूपये असून याप्रकरणी अज्ञात चोरट्रयांविरूद्ध ग्रामविकास अधिकारी शिवानंद माणिकराव बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार कदम हे करीत आहेत.
* मळणी यंत्रात अडकून एका वृध्दाचा मृत्यू
तुळजापूर -: दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोर्डा शिवारातील संपतराव कोळेकर यांच्या शेतात राहुल अमृतराव कोळेकर यांनी संपतराव कोळेकर याच्या ताब्यातील मळणीयंत्र व ट्रॅक्टरमधील रॉडला सुरक्षित न ठेवल्याने मळणीयंत्रावर काम करीत असलेले दादाराव माधव देडे (वय ८० वर्षे, रा. मोर्डा) यांचे धोतर मळणी यंत्राच्या रॉडमध्ये अडकून ते गंभीर जखमी केले, त्यांच्यावर उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्याना त्यांचा मृत्यू झाली. याप्रकरणी जनार्धन दादाराव देडे यांनी दि. ५ नोव्हेंबर रोजी तुळजापूर पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल कोळेकर याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार दळवी हे करीत आहेत.