मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी फेब्रुवारी 2012 मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांमधील उच्चतम गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी भारत सरकारची महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची मुदत 15 जानेवारी 2013 पर्यंत वाढविण्यात आली आहे. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी ऑन लाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2012 होती.
ऑनलाईन अर्ज करण्याच्या पध्दतीसाठी व इतर अधिक माहितीसाठी संचालनालयाच्या www.dhepune.gov.in/css या संकेत स्थळाचे अवलोकन करावे, असे संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य-1, पुणे यांनी आवाहन केले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याच्या पध्दतीसाठी व इतर अधिक माहितीसाठी संचालनालयाच्या www.dhepune.gov.in/css या संकेत स्थळाचे अवलोकन करावे, असे संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य-1, पुणे यांनी आवाहन केले आहे.