महाराष्‍ट्राची कुलस्‍वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्‍या भक्‍तासाठी व 'तुळजापूर लाईव्‍ह' च्‍या वाचकासाठी आम्‍ही खास श्री तुळजाभवानी मंदीर संस्‍थानसह उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील विविध शासकीय कार्यालय व  मुंबई मंत्रालयीन सचिवांचे फोन नंबर, इतर महत्‍त्‍वाचे दुरध्‍वनी सूची आता 'तुळजापूर लाईव्‍ह' वर उपलब्‍ध करण्‍यात आले आहे. वाचकांनी 'उस्‍मानाबाद जिल्‍हा महत्‍त्‍वाचे दूरध्‍वनी क्रमांक' यावर क्लिक करा व पाहिजे तो दुरध्‍वनी तात्‍काळ मिळवा.
      श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर संस्‍थान, मंत्रालयीन सचिव, विधान भवन,  उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील महसुल विभाग, तहसिलदार, जिल्‍हा परिषद, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी, इतर शासकीय कार्यालये, कृषी विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय विभाग, भूमी अभिलेख, कोषागार कार्यालय, नगरपरिषदा, बँका, विश्रामगृहे, शैक्षणिक संस्‍था, रेल्‍वे, विभागीय आयुक्‍त कार्यालय, पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यासह जिल्‍ह्यातील सर्व आमदार, त्‍यांचे सर्व स्‍वीय सहाय्यक यांचे फोन, मोबाईल, निवास फोन याची सविस्‍तर माहिती तुळजापूर लाईव्‍हवर दि. 25 डिसेंबर 2012 पासून सुरू करण्‍यात आली आहे. ही दूरध्‍वनी सूची आमच्‍यापरीने संबंधिताचे नाव, फोन नंबर, पत्‍ता संकलित करुन प्रसिध्‍द करण्‍यात येत आहे.  एखादे फोन नंबर, नाव या सुचीत न आल्‍यास ही सूची अपूर्णही असू शकते. संबंधितानी व वाचकानी त्‍यात बदल सुचविल्‍यास त्‍याचा आवश्‍य विचार केला जाईल. आपणही आवश्‍यक व महत्‍त्‍वाचे दूरध्‍वनी आम्‍हाला पाठवून या सूचीत आपण भर घालू शकता.
 
Top