मुंबई -: कोल्हापूर जिल्हयातील आजरा येथे प्रादेशिक नारळ रोपवाटिका स्थापन करण्यास प्रशासकीय मान्यता तसेच राज्य शासनाच्या 50 टक्के हिश्श्याची  8 लाख 75 हजार रुपयांची रक्कम खर्च करण्यास वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. 
           कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यातील हवामान नारळ पिकास अनुकूल आहे तेथे वाहतूक व दळणवळणाची चांगली सोय आहे. या रोपवाटिकेवर 70 हजार रोपांची निर्मित्ती करण्यात येणार आहे. तसेच नारळाच्या लागवडीस उत्तेजन देण्याकरिता चांगल्या प्रतीच्या रोपांची आवश्यकता आहे. नारळ विकास मंडळ चांगल्या प्रतीच्या रोपांकरिता 50 : 50 टक्के हिस्सा या तत्वावर प्रादेशिक रोपवाटिका करण्यास तयार आहे. या रोपांसाठी 17.50 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. यापैकी नारळ विकास मंडळाने 50 टक्के हिश्श्याप्रमाणे 8 लाख 75 हजार रुपये खर्च देण्याची तयारी दर्शविली आहे.
 
Top