नळदुर्ग -: एकात्मिक पाणलोट व्‍यवस्‍थापन केंद्र यशदा, पुणे व परिवर्तन सामाजिक संस्‍था, नळदुर्ग, तालुका कृषी अधिकारी कळंब यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने वसुंधरा पाणलोट विकास प्रकल्‍पांतर्गत भोसा (ता. कळंब) गावातील महिलांसाठी प्रकल्‍प परिचय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते. या शिबीरात गावातील महिलांचा अतिशय चांगला प्रतिसाद होता. परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारूती बनसोडे यांनी पाणलोट विकास प्रकल्‍प कसा राबवणार आहे, या सदंर्भात सविस्‍तर माहिती दिली. त्‍यानंतर अण्‍णा सातपुते यांनी आभार मानले व शिबीराचा समारोप करण्‍यात आला.
 
Top