सोलापूर :- सोलापूर - हैद्राबाद या चौपदरी महामार्गासाठी संपादीत करण्यात येणा-या जमीनी संदर्भात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांची बैठक पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
      नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया सोलापूर - हैद्राबाद महामार्ग रस्त्या संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे अधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
       या महामार्गासाठी संपादीत करण्यात येणा-या जमीनीबाबत संबंधित शेतक-याला विश्वासात घेऊन जमीन संपादीत करण्यात येईल तसेच याबाबतीत मी व्यक्तिगत लक्ष देईल असे चव्हाण याप्रसंगी म्हणाले.
     सोलापूर ते तलमोड या ठिकाणापर्यंत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, जमीन  संपादीत करणार असुन यामार्गावरील अणदुर, फुलवाडी, धनगरवाडी या ठिकाणचा जमीन संपादनाचा प्रश्न मिटला असल्याची माहिती नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रबंधक तकनिकी उमेश झगडे यांनी यावेळी दिली.
    या बैठकीसाठी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, मुकुंद डोंगरे, सुनिल चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
 
Top