पंढरपूर : ग्रामीण ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सहकारी बँका निसंधिग्दपणे अधिक महत्वाची भूमिका बजावू शकतात पंढरपूर को.अर्बन बँक अशा बँकेपैकी आहे. यंदा ही बँक शंभर वर्ष पुर्ण करीत आहे हा सहकाराच्या इतिहासातील गौरवपूर्ण क्षण आहे अशा शब्दात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पंढरपूर को.अर्बन बँकेचा गौरव केला.
    पंढरपूर को.अर्बन बँकेचा शताब्दी समारोप मार्केट कमिटीच्या प्राणंगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
    यावेळी व्यापसपिठावर राज्यापाल के.शंकरनारायण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार सुधाकर परिचारक, बँकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष उदय उत्पात उपस्थित होते. 
     1904 सालच्या सहकार कायद्याने या चळवळीला खरी गती मिळाली. सन 1913-14 साली आलेल्या अर्थिक संकटात ही चळवळ टिकून राहीली. सध्या सहकारी बँकासमोर अनेक आव्हाने असून या परिस्थित बँकांनी स्वत:ची कार्यकुशलता वाढविण्याची आवश्यकता आहे. तसेच सहकारी बँकांनी आपल्या खंडप्राय देशातील गोरगरीब व मागासालेल्या प्रवर्गासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादनही राष्ट्रपती महोदयांनी यावेळी केले.
      याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशाच्या प्रगती मध्ये बँकाचा मोठा हिस्सा असून देशाच्या आर्थिक उलाढालीतही सहकाराचा मोठा वाटा आहे. देशाच्या अर्थिक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे.
    सध्या दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवत असून याचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून दुष्काळ निवारणासाठी अधिका-यांनी सजग रहावे असे आवाहनही मुख्यमंत्री श्री.चव्हाण यांनी केले.
  यावेळी पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्याचे पाणीपुरवठा,स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी राष्ट्रपती महोदयांना निवेदन दिले.
    याप्रसंगी पंढरपूर अर्बन बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन राष्ट्रपती श्री.मुखर्जी यांच्या हस्ते  कळ दाबून करण्यात आले.बँकेच्या आजपर्यतच्या वाटचालीचा डाक्युमेंट्रीच्या (माहितीपटाच्या) सी.डीचे व स्मरणिकेचे प्रकाशन राज्यपाल के.शंकरनारायण यांच्या हस्ते करण्यात आले तर कोअर बँकीग प्रणालीचे उदघाटन मुख्यमंत्री महोदयांनी केले.
    प्रारंभी प्रास्ताविकामध्ये बॅकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी बँकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला तसेच आगामी काळात 3 हजार कोटी रुपयांच्या ठेवीचे उद्दीष्ट त्याच बरोबर राज्याच्या  विविध भागात 50 शाखांचा विस्तार करणार असल्याचे सांगितले.शेवटी  बँकेचे उपाध्यक्ष उदय उत्पात यांनी आभार मानले      
 
Top