यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण) - पूर्वतयारीपासूनच अनेक साहित्यबाह्य वादांमध्ये गुरफटलेल्या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, मावळते अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, स्वागताध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याला विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, राज्याचे उत्पादनशुल्कमंत्री गणेश नाईक, रत्नागिरीचे पालकमंत्री भास्करराव जाधव, पर्यावरणमंत्री सचिन अहिर, खासदार हुसेन दलवाई, खासदार अनंत गिते, खासदार डॉ. नीलेश राणे, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा जाधव, नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांची प्रमुख उपस्थिती राहील.
उद्घाटन सोहळ्याआधी सकाळी साडेआठ ते साडेदहा या कालावधीत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून तिचे उद्घाटन चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर संमेलनस्थळी आयोजित आलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन वसंत डहाके करतील. दुपारी 3.30 वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.
कविसंमेलनाची मेजवानी
महाराष्ट्रातील ख्यातनाम तसेच उदयोन्मुख कवींचा समावेश असलेल्या कविसंमेलनास सभामंडप क्रमांक एक येथे संध्याकाळी साडेसहा वाजता प्रारंभ होईल. या कविसंमेलनात नारायण कुलकर्णी-कवठेकर, क्रांती सडेकर, अशोक लोटणकर, ए. के. शेख, संतोष शेणई, बबलू वडार, संजीवनी तडेगावकर, योगिराज माने, अनिल निगुडकर, दीपक शेडगे, वंदना किणीकर, विष्णू सूर्या वाघ, सुखदेव धाणके, कैलास गांधी, मधुसूदन नानिवडेकर, रमेश वासकर, अस्मिता गुरव, डॉ. अनुजा जोशी, ज्ञानेश्वर झगडे, के. जे. पवार आदी कवी सहभागी होणार आहेत. या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र तसेच बृहन्महाराष्ट्रातून आलेल्या साहित्यप्रेमींना काव्यधारेत चिंब भिजण्याचा आनंद या कविसंमेलनामुळे मिळणार आहे. रात्री साडेनऊ वाजता मराठी गीत गायनाचा कार्यक्रम असून तो प्रख्यात गायिका मृदुला दाढे-जोशी सादर करतील.
ग्रंथदिंडीची सुरुवात जुन्या मामलेदार कार्यालयापासून...
समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या चिपळूणमधील घरापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ करण्याचे संयोजन समितीने ठरवले होते. त्यावर वाद झाल्याने समितीने निर्णय बदलला. चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या आधी त्या ग्रंथालयाचे नाव नेटिव्ह लायब्ररी असे होते. ही नेटिव्ह लायब्ररी पूर्वी मामलेदाराच्या कार्यालयात होती. जुन्या मामलेदार कार्यालयपासून ग्रंथदिंडीला प्रारंभ करण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे. त्यामुळे हमीद दलवाई यांच्या घरापासून एखादी वेगळी ग्रंथदिंडी निघण्याची शक्यता आहे. समितीचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी सांगितले की, ग्रंथदिंडी जुने मामलेदार कार्यालयापासून सुरू होऊन संमेलनस्थळी पोहोचेल.

* सौजन्य दिव्यमराठी