नवी दिल्ली -: दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणात पीडितेवर सर्वाधिक अत्याचार 'अल्पवयीन' आरोपीनेच केले होते, अशी माहिती समोर आली आहे. हा आरोपी स्वतःला अल्पवयीन सांगत आहे. त्याच्या हाडांची तपासणी करण्यात आली आहे. अस्थि घनता चाचणी करण्यात आली असून या चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याचे वय स्पष्ट होणार आहे.
'दामिनी'वर चालत्या बसमध्ये सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. या अल्पवयीन आरोपीने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला होता. एवढेच नव्हे तर ज्या जखमांमुळे ती प्राणाला मुकली, त्या जखमाही त्यानेच दिल्या होत्या. हा आरोपी स्वतःला अल्पवयीन सांगत आहे. त्यानेच तिच्यावर बलात्कारानंतर लोखंडी रॉड निर्दयीपणे घुसविला होता. पीडित मुलगी आणि तिच्या मित्राला बसबाहेर फेकून देण्याची चिथावणी दिली होती. हाच संपूर्ण घटनेचा सुत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोखंडी रॉडमुळे पीडितेच्या आतड्याच बाहेर निघाल्या. अंतर्गत जखमा एवढ्या गंभीर होत्या, की रक्तस्त्राव थांबता थांबत नव्हता. शस्त्रक्रीया करुन तिच्या आतड्या काढण्यात आल्या होत्या. परंतु, ती मृत्यूशी लढा जिंकू शकली नाही.

* सौजन्य दिव्यमराठी