सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये दि. 3 मार्च रोजी महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महालोक अदालतीत दिवाणी, फौजदारी, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 138, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, शाळा प्राधिकरण, सहकार, कामगार, औद्योगिक न्यालयातील, कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचे व दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. सदर महालोकअदातमध्ये आपली प्रलंबित असलेली प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी प्रलंबित असलेल्या कोर्टामध्ये अर्ज करावा व सदर संधीचा सर्वांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आर. व्ही. कोकरे, सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांनी केले आहे.