बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील महाराष्ट्र विद्यालयात सुरु असलेल्या इयत्ता बारावीच्या पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर सुरु असतांना भरारी पथकाला आढळून आलेल्या 3 कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी अक्षय अनिल आसलकर (रा. चोरमुले प्लॉट), बी.पी.सुलाखे महाविद्यालयाचा चेतन अनिल चव्हाण (रा. मंगळवार पेठ) विकास चंद्रकांत झोंबाडे (रा. सोलापूर रोड म्हेत्रे चाळ) अशी कॉपीबहाद्दरांची नावे आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी परीक्षेतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी प्रभावी यंत्रणेची उभारणी करत गैरप्रकारास मदत करणार्या तसेच वातावरण निर्मितीला पोषक ठरणार्या केंद्रसंचालक, केंद्रसहसंचालक तसेच वर्गप्रमुखांवर देखील कारवाई करण्यात येईल, असे आदेश दिल्याने सर्व शिक्षण मंडळात कारवाईच्या बडग्याने पाचावर धारण झाली होती. झोपलेले शिक्षण मंडळ जागे होऊन संपूर्ण यंत्रणा उभी करत कॉपीचे गैरप्रकार न होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असतांनाच आलेल्या भरारी पथकाला यातील तीन विद्यार्थी गैरप्रकार करत असल्याचे निदर्शनास येताच शिक्षकांचे व केंद्रप्रमुखांचेही चेहरे बघण्यासारखे झाले. आपल्यावरही कारवाई होणार या भितीने इकडे तिकडे फोनाफोनी सुरु झाली व बार्शी पोलिसांत आल्यावर त्यांनी शिक्षण विभागाच्या प्रमुखांशी फोनवर चर्चा करत यातील विद्यार्थी वगळून कारवाई करण्याची विनंती केली. त्यांच्या सांगण्यावरुन केंद्रसंचालिका मीना इट्टेवाड यांच्याकडून रितसर फिर्याद दाखल करुन विद्यार्थ्यांवर 1982 चे कलम 7 नुसार परीक्षेतील गैरप्रकार प्रतीबंधात्मक कलमद्वारे तक्रार नोंदविण्यात आली. सदरच्या घटनेचा तपास पो.हे.कॉ. रमेश मांदे हे करीत आहेत.