सोलापूर :- दुष्काळ आणि वाढत्या गुन्हेगारीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले. मंत्री राज्याचे मालक व्हायला निघाले. त्यांनी गुजरातमधील विकास पाहावा. मोदींच्या आंघोळीचे दोन चमचे पाणी तीर्थ म्हणून प्यावे, अशी झणझणीत टीका राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली.
राज ठाकरे म्हणाले, मी नकला करतो असे अजित पवार म्हणतात. या बेअकलांच्याच नकला करव्या लागतात. त्यांचे एक मंत्री भास्कर जाधव शाही थाटात लग्न करतात. त्यांना पवारांनी कानपिचक्या दिल्या. दुष्काळ आहे. असा थाट योग्य नाही. पवारांची ही भूमिका मान्य आहे. परंतु, पवार साहेबांना एकच प्रश्न आहे. दुष्काळ आला कसा? सिंचनाच्या कामाचे पैसे गेले कुठे? दुष्काळाचे संकेत मिळाले होते. भूकंप आणि पूर हे आवाज करत येतात. पण दुष्काळ चोरपावलाने येतो. दुष्काळ येणार हे माहिती आहे. शरद पवारांनीच सांगितले होते की 1972 सारखा दुष्काळ येण्याची भीती आहे. मग महाराष्ट्र सरकार कमी का पडले, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

अजित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, ते सकाळी लवकर उठतात. पैशाचे व्यवहार असतात ना. ते लपवायचे कसे याच्याच चिंतेने त्यांना झोप येत नाही. बरं, सकाळी लवकर उठून यांनी महाराष्ट्राचे काय केले? वय 55 झाले तरी काकाच्या जीवावर जगत आहे. काकांनी हात काढला तर पानपट्टीवाला तरी विचारेल का? असा टोला राज यांनी अजित पवारांना लगावला.
सुशीलकुमार शिंदे हे बिनकामाचे गृहमंत्री आहेत. ते म्हणजे राजकारणातले शशि कपूर आहेत, 'हॅप्पी गो लकी'. ते केंद्रात गेले. दलित माणसाला गांधी परिवाराने एवढे काही दिले. परंतु, त्यांनी दलितांना काय दिले? असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

राज ठाकरे म्हणाले, लातूर जिल्ह्यात दररोज 150 बोअरचे काम होत आहे. किती खोल जात आहेत? ते 1000 ते 1200 फुट खोल जात आहेत. हे बिकट चित्र असून यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी आर. आर. पाटील यांच्यावरही कडाडून टीका केली. त्यांच्यासारखा बिनकामाचा गृहमंत्र असल्यास पोलिस तरी काय करतील, असे राज ठाकरे म्हणाले.