बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी तालुका भगवंत मित्रमंडळाच्या वतीने राजेंद्र मिरगणे यांना भगवंतरत्न, कमलेश मेहता यांना बार्शी तालुका भूषण, नामदेव घायितडक यांना जीवनगौरव पुरस्कार तसेच विविध विभागातील उल्लेखनीय कार्य केलेल्या 18 व्यक्तींचा विशेष गौरव करण्यात आला.
     मागील 13 वर्षांपासून सुरु असलेल्या बार्शीतील पुणेकर झालेल्या व्यक्तींनी स्थापन केलेल्या बार्शी तालुका भगवंत मित्रमंडळातर्फे उल्लेखनीय कार्यकरणा-या बार्शीकरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. बार्शीत राहून उल्लेखनीय कार्याबद्दल भगवंतरत्न, बार्शीतील व्यक्तींनी कोणत्याही क्षेत्रात केलेल्या विशेष कार्याबद्दल बार्शी तालुका भूषण तसेच बार्शीतील व्यक्तींनी बाहेर राहून उल्लेखनीय कार्य करुनही त्यांची बार्शीकरांनी दखल घेतली नसेल त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो.
     हा कार्यक्रम रविवाद दि. 24 फेब्रुवारी रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी हरिश्चंद्र गडसिंग, प्रमुख पाहुणे भाऊसाहेब आंधळकर, दिनकर पाटील, मुकूंद कुलकर्णी, आर.एम.करजखेडे, अतुल पाटील, राजन बुडूख, अपर्णा आंबेडकर, भास्कर जामदार आदी उपस्थित होते.
     यावेळी दिनकर पाटील, मुकूंद कुलकर्णी, रामलिंग आढाव, करजखेडे, अतूल पाटील, राहूल जगदाळे, मोहसिन शेख, कमलेश मेहता, राजाभाऊ काकडे, राजेंद्र मिरगणे, नामदेवराव घायितडक, भाऊसाहेब आंधळकर, सुधाकर बोकेफोडे, ज्योती सपाटे, हरिश्चंद्रगडसिंग यांनी विचार मांडले.
     भाऊसाहेब आंधळकर यांनी बोलतांना पुरस्कार मिळालेल्या मिरगणे यांचे सामाजिक कार्य चांगले असून त्यांनी राजकारणात येण्याअगोदर विचार करुन निर्णय घ्यावा असे म्हटले. यापूर्वी आपल्याला याच मंडळाकडून पुरस्कार मिळाला असून सामाजिक कार्याचा व राजकारणाचा मला चांगला अनुभव आल्याचे सांगत आगे बढो म्हणणारे लोक केंव्हा पाठीमागून निसटू जातील हे सांगता येत नाही असे अनुभवाचे बोल सांगीतले. सामाजिक कार्यात राजकारण नको पण या व्यासपीठावर मी पुरस्कार देणार्‍यांच्या शेजारी असलेला फोटो पाहून मिरगणे व मेहता यांना काही सामाजिक लोकांकडून त्रास होण्याची शक्यता वर्तवली. इतक्या खालच्या पातळीवरील बार्शीचे राजकारण असून आपण या सर्वांना भारी असून शिवसेनेच्या तिकीटावर आपण आमदार होणार असल्याचेही ठणकाऊन सांगीतले. बार्शीकरांच्या स्वप्नातील सुंदर शहराच्या निर्मितीला हातभार लावतांना मिरगणे यांनी पुण्याहून बार्शीत येऊन चांगल्या दर्जाच्या दहा दहा मजली इमारती उभ्या केल्या. 
     विशेष सत्कारामध्ये लेखिका सुजाता बोरा, चार्टर्ड अकौंटंट श्रध्दा वायचळ, गिर्यारोहक अनन्या शेटे, शिवाजी हावळे, पत्रकार भक्ती, डिझाईनर उदय मोहिते, विजय ठोंगे, अशोक लोहार, धिरज मांजरे, गायत्री जोशी, शेखर मस्के, अनिल शिंदे, अमर देवकर, शिवाजी जाधव,  सतीश कुलकर्णी, अरुण बकाल, राहुल बुलबुले यांचा विशेष गौरव करण्यात आला.
 
Top