सोलापूर -: सोलापूर जिल्ह्यातील फेब्रुवारी 2013 पासून पुढील होणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक/ पोट निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिध्द करण्याबाबतचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडून वेळोवेळी जाहिर केला जाणार आहे.  त्यानुसार विधानसभेच्या मतदार यादीवरुन प्रभाग निहाय तयार करण्यात आलेल्या प्रारुप स्वरुपातील मतदार यादी तहसिल कार्यालय, तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाचे ठिकाणी प्रसिध्द होणार आहे. सदर मतदार यादीतील प्रभाग निहाय मतदार यादीबाबत काही आक्षेप असतील तर याबाबत सर्व संबंधितांनी तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी आक्षेप नोंदवावेत. याबाबतची व्यवस्था संबंधित तालुक्याचे ठिकाणी करण्यात येणार असून तहसिलदार हे जिल्हाधिकारी यांचे प्राधिकृत अधिकारी आहेत. मतदार यादीबाबत नांदविण्यात आलेल्या आक्षेप अर्जावर तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी सुनावणी होऊन सुनावणी नंतर अंतिमरित्या मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. आक्षेप कर्त्यांनी विहित वेळेत आक्षेप संबंधित तालुक्याचे तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी विहित कालावधीत नोंदवावेत असे आवाहन जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
 
Top