![]() |
महादेवी सुळ |
तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर ग्रामपंचायतीची सात जागेकरीता निवडणूक 2012 मध्ये घेण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये शिवसेनेने सातच्या सात जागी आपले उमेदवार निवडून आणल्याने कॉंग्रेसचा दारुण पराभव केला होता. त्यातील एक उमेदवार सौ. महादेवी गुरुनाथ सुळ या वार्ड नं. एक आणि तीन या वार्डामधुन विजयी झाल्या होत्या. दोन्ही ठिकाणी निवडून आल्यानंतर सात दिवसाच्या आत एका जागेचा राजीनामा देणे बंधनकारक असताना महादेवी सुळ यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांचे दोन्हीही सदस्यत्व रद्द झाले होते. त्यानंतर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या महादेवी सुळ यानी कॉंग्रेसच्या अनुसया सुळ यांचा पराभव केला. महादेवी सुळ या सरपंच पदाच्या उमेदवार असून मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत त्या प्रचंड मतानी विजय झाल्या आहेत. वार्ड नं. तीन मध्ये सौ. अनुसया सुळ यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.