नळदुर्ग :- जागतिक महिला दिनानिमित्त नळदुर्ग शहर भोई समाजाच्यावतीने रविवार दि. 17 मार्च रोजी कर्तृत्वान महिलांचा सत्कार समारंभ व महिला बचत गटाच्या स्टॉल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन पशुसवंर्धन, दुग्धविकास व मत्स्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर हे राहणार आहेत. सत्कारमूर्ती म्हणून उस्मानाबाद एआरटीओ शेजवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे वालवलकर, तुळजापूर पंचायती समितीचे गटशिक्षणाधिकारी तृप्ती ढेरे, उपशिक्षणाधिकारी सविता भोसले यांचा सत्कार ना. चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये महिला बचत गटाच्या भव्य स्टॉलचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नळदुर्ग शहर भोई समाजाचे अध्यक्ष सुनिल उकंडे यांनी केले आहे.