नळदुर्ग :- भरधाव टँकरची तवेरा गाडीस जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात 9 जण जागीच ठार तर एका बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची रविवार रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील हुमनाबाद (कर्नाटक राज्य) जवळील चिद्री गावातील पेट्रोल पंपासमोर घडली. अपघातातील मयत व जखमी हे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील शहापूर या गावचे रहिवाशी असून ते आंध्रप्रदेशातील हैद्राबादकडे रामोजी फिल्मसिटी पाहण्यासाठी व तेथून तिरुपती बालाजीचे दर्शनासाठी जात असताना हुमनाबाद जवळ काळाने त्यांच्यावर साखर झोपेतच घाला घातला. मयतामध्ये सहा पुरुष, दोन महिला दोन लहान मुलींचा समावेश आहे.
शामराव जाधव (वय 55 वर्षे), किसन जाधव (वय 45), अर्चना शेटे (45), शैलजा शेटे (40), विजय शेटे (40), शहाजी शेटे, महिपती शेटे, अभिषेक शेटे (वय 8 वर्षे), वैष्णवी शेटे (वय 13 वर्षे), विश्वास खामकर, लखन चव्हाण, सर्व रा. शहापूर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर असे मिळून दहा जणांचा या भिषण अपघातात करुण अंत झाला. हुमनाबाद जवळील चिद्री गावातील पेट्रोल पंपासमोर हैद्राबादहून सोलापूरकडे टँकर (क्रं. एमएच 04 सीए 7149) हा भरधाव वेगाने येत होता. तर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील शहापूर गावातील साठे परिवार नातलगासह हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटी व तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी तवेरा कार (क्रं. एमएच 12 जीएन 1833) मधून जात होते. पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान भरधाव वेगाने येणा-या टँकरचालकाने ताब्यातील टँकर हलगयीने व निष्काळजीपणाने चालवूनत समोरुन येणा-या कारला जोराची धडक दिली. यावेळी मोठा आवाज झाला. अपघातानंतर मृतदेह रस्त्यावर छन्नविछिन्न अवस्थेत विखुरलले गेले. अपघातात वैष्णवी साठे ही बालिका गंभीर जखमी झाल्याने तिला हैद्राबाद येथील उस्मानिया हॉस्पिटलमध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले. मात्र उपचारावेळी ती मरण पावली. ही घटना पाहणा-या उपस्थितांचे काळीज हेलावून गेले.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच कॉंग्रेस पक्षाचे आमदार राजशेखर, हुमनाबादचे विभागीय पोलीस अधिकारी अमरनाथ रेड्डी यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली व मदतकार्य केले. हा अपघात राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध झाल्याने तब्बल चारा ते पाच तास वाहतुक थांबली होती. महामार्गाच्या दूर्तफा वाहनाची मोठी रांग लागली होती. याप्रसंगी वाहुतक पोलीस अधिकारी काळे यांनी विशेष प्रयत्न करुन वाहतुक सुरळीत करुन महामार्ग मोकळा केला. दरम्यान, हुमनाबाद परिसराच्या शंभर किलोमीटर परीघ क्षेत्रात तीन महिन्यात लहान मोठे 70 अपघात झाले असून त्यात शंभरपेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान हा अपघात देव दर्शन करुन येताना किंवा देव दर्शन करण्यासाठी जाताना अपघात झाल्याचे नागरिकातून बोलले जात आहे.