बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: झाडबुके महाविद्यालयातील समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. सुर्यकांत घुगरे यांच्या संतसाहित्य व बसवेश्वर वचनचिंतन आणि क्षितीज या दोन पुस्तकांचे प्रकाशन शनिवार दि. 20 मे रोजी होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष पां.न. निपाणीकर, कवी कालिदारस मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुमन चंद्रशेखर, प्रमुख कार्यवाह शब्बीरभाई मुलाणी, कार्याध्यक्ष मुकुंदराज कुलकर्णी, डॉ. सुर्यकांत घुगरे आदी उपस्थित होते.
हा प्रकाशन सोहळा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत तुकाराम सभागृहात ज्येष्ठ संत साहित्यिक पद्मश्री डॉ.यु.म.पठाण यांच्या शुभहस्ते होत आहे. यावेळी अध्यक्षस्थानी पत्रकार राजा माने तर डॉ. राजशेखर सोलापूरे, श्रीमती प्रभाताई झाडबुके, आमदार दिलीपराव सापेल, डॉ.बी.आय. यादव, सौ. वर्षाताई ठोंबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद बार्शी व कवी कालिदास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
डॉ. घुगरे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज गावचे रहिवासी आहेत. सन 1975 पासून बार्शीतील झाडबुके महाविद्यालयात समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. सन 1990 साली शिवाजी महाविद्यालयात सादर केलेल्या वीरशैवीझम इन महाराष्ट्र या संशोधनासाठी त्यांना पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. सन 2002 साली वॉशिंग्टन येथील विद्यापिठाकडून त्यांच्या प्रकाशित साहित्याच्या गौरवार्थ डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. तसेच सन 1988 साली युगोस्लाव्हियामधील झॅब्रेग येथीलबाराव्या आंतरराष्ट्रीय मानवशास्त्रीय परिषदेत त्यांनी शोधनिबंध सादर केला. वीरशैव विश्वकोष सह 34 ग्रंथाचे लेखन आणि सहलेखन त्यांनी केले आहे. आरक्षण आणि जागतिकीकरणसह आठ ग्रंथाच्या प्रस्तावना लेखनृ कर्नाटक शासन तसेच महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांनी वीरशैवीझम इन इंडिया या त्यांच्या ग्रंथाला संदर्भग्रंथ म्हणून मान्यता दिली. आजपर्यंति अनेक वृत्तपत्रे व नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख व कविता प्रसिध्द झाले आहे. विद्यापीठ, प्रांत व राष्ट्रीय स्तरावरील 60 समाजशास्त्रीय तसेच इतरही संमेलने, चर्चासत्रे व अधिवेशनात शोधनिबंध सादर, कपिलधार येथील अखिल भारतीय मराठी वीरशैव साहित्य संमेलन 4 थे याचे अध्यक्षपद भूषविले. सहा राज्यांमधील 28 पुरस्काराने सन्मानित, त्यांच्या साहित्यांची दखल घेत महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेने व अखि भारतीय मराठी वीरशैव लिंगायत साहित्य मंडळ नागपूर यांनी डॉ. सुर्यकांत घुगरे संशोधन ग्रंथ पुरस्कार हे दोन राज्यस्तरीय पुरस्कार सुरु केले आहे.