बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सुनिल पोपट कोंढारे या युवकाच्या तोंडावर अँसिड हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी दोन आरोपींना पकडण्यात पांगरी पोलिसांना यश आले आहे.
किरण अनिल मोरे (वय 24, रा. तामलवाडी, तुळजापूर), स्वप्नील हंबीरराव (लक्ष्मीपेठ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. मोटारसायकलवर गुन्ह्यात सहभागी झालेल्या दुस-या आरोपीला पोलिसांनी तपासात उघड केले असून दोन्ही आरोपींना गजाआड करुन त्यांना न्यायासमोर हजर करण्यात येणार आहे. यातील गुन्ह्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास पांगरी पोलीस ठाण्याचे भडुरे हे करीत आहेत.