बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: आर्थिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात चांगले काम करणारी नावाजलेली शिवशक्ती अर्बन बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पन्नास हजार रुपयांचा धनादेश सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे, संचालक आप्पा लोखंडे, समाधान राऊत व बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.