
यावेळी बोलताना शिवाजी पोतदार म्हणाले की, सध्याचे वातावरण स्फोटक व चिंतेचे असून बालवयातच आता बालकांवर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. त्यासाठी बाल वाचनालये सुरु करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी बळीराम जेठे यांनी गोष्टी सांगून उपस्थित बालकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास डॉ. सुजित तोडकरी, संदीप सदाफुले, प्रशांत माने, काशिनाथ घुगे, लक्ष्मण नरे, खंडू मुळे यांच्यासह नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव घुगे यांनी तर सुत्रसंचालन देवेंद्र घुगे यांनी केले.