नळदुर्ग : श्री क्षेत्र रामतीर्थ येथे प्रभू श्रीराम नवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन पार पडले. शुक्रवार रोजी रात्री भजन व कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी परिसरातील उपस्थित होते. दुपारी बारा वाजता गुलालाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मोठ्याप्रमाणात भाविकांनी हजेरी लावून श्रीरामचंद्राचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भाविकांना श्री विष्णुप्रसाद शर्मा महाराज यांनी महाप्रसादाचे वाटप केले. शहरातील रामदासी यांच्या निवासस्थानी असणा-या राममंदिरातही श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या ठिकाणीही प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी शहरातील भाविकांची गर्दी उसळली होती.