बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: उन्हाची तीव्रता, पाण्याची टंचाई, नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सामाजिक जाणिवेतून लोकसहभागातून ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा केली जात आहे. बार्शी येथे तुळजापूर रोड येथील हनुमान मंदिरासमोर अभिलाष अँग्रोच्या सौजन्याने आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सुनिल कांबळे यांनी पाणपोई सुरु केली आहे. या पाणपोईचे उदघाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दगडू मांगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवाजी पाटील, अभिलाष अँग्रोचे सुनिल कांबळे, माजी नगरसेवक पंडित पाटील, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत हवालदार, प्रगतीशिल शेतकरी सुमंत गाढवे, राजेंद्र शिंदे आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार संजय बारबओले यांनी केले.