बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: यु.के.जी. च्या छोट्या मुलांना पदवीदान समारंभात केलेल्या लहान मुलांच्या सन्मानाने बार्शीतील सेंट जोसेफ स्कूलचे नाव राज्यात झाले आहे. आपल्याला केवळ विद्यापीठात पदवीदान समारंभ होत असल्याची माहिती आहे. परंतु दिव्यांची सजावट, लहान चिमुकल्यांच्या डोक्यावर टोपी, हातात ड्रीगी या सर्व वातावरणात पालक, मुलांचे व शिक्षकांचे मन आनंदाचे झाले होते.
या लहान चिमुकल्या मुलांना ड्रिगी देण्यासाठी शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक, सोलापूर विद्यापीठातील तिरुपती सर, ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी होमगार्डस, सुप्रीम कोर्टातील वकील व युपीएस्सीचे सदस्य अनिल विपत, आवाजावरील प्रभुत्व मिळविलेली गायिका बेला सुलाखे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी बापूसाहेब शितोळे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस केरळमधील खास ड्रमच्या सुरांनी आनंदाचे वातावरण निर्माण केले. छोट्या मुलांनी फुगविलेल्या फुग्यांनी स्वागत झाले. प्रार्थना गीत, दिपप्रज्वलन व भरतनाट्यम यामुळे कार्यक्रमात रंगत आणली. बच्चे मनके सच्चे, पापा कहते है, यासारख्या गाण्यांनी कार्यक्रम झाला.
जिल्हा परिषदेच्या केंद्र प्रमुखांच्या भेटीत पालकांना समजले की, आपली शाळा ही महाराष्ट्रातातील शासनमान्य व नामांकित चांगल्या सुविधायुक्त आहे.