सांगोला (राजेंद्र यादव) :- नुकत्याच सिंहगड इंस्टिटयूटस, कोर्टी, पंढरपूर येथे आयोजित झालेल्या विंग्ज 2013 या तांत्रिक स्पर्धेत फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगोला येथील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे.
राज्यस्तरीय प्रकल्प प्रदर्शन स्पर्धेत सिव्हिल इंजिनीअरींगच्या दुसर्या वर्षात शिकत असलेले प्रतीक खडतरे, मयुरेश कोळेकर, रियाज पटेल आणि संशोधित विकसित केले. या तंत्रज्ञानामुळे बांधकामासाठी लागणार्या पाण्यात जवळपास 75% बचत शक्य आहे. भविष्यकाळात सांगोला आणि परिसरातील बांधकामासाठी हे तंत्रज्ञान वापरुन मोठ्या प्रमाणात पाणी बचत करणे शक्य होणार आहे.
फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस अशाप्रकारचे समाजपयोगी व सहज अंमलात आणण्याजोगे तंत्रज्ञान विकसित करण्यात नेहमीच अग्रेसर असलेला संतोष माळी या विद्यार्थ्यांनी त्यांच्या ड्रीपक्युरिंग या प्रकल्पाचे सादरीकरण करुन द्वितीय क्रमांक पटकाविला. सोलापुर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा विचार केला असता, उन्हाळ्यात बांधकामासाठी पाणी अजिबात उपलब्ध नसते. यावर उपाय म्हणुन सिव्हील इंजिनीअरींगचे विभागप्रमुख प्रा. राम किन्हीकर यांनी ड्रीप क्युरिंग हे तंत्रज्ञान राहील. या इंजिनीअरीगं कॉलेजातून बाहेर पडणारे विद्यार्थी नेहमीच समाज आणि पर्यायाने देश घडविण्यात पुढे राहतील. असा विश्वास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब रुपनर यांनी व्यक्त केला आहे. भाऊसाहेब रुपनर यांनी तसेच संस्थेचे प्राचार्य डॉ.सतीश तानवडे, डीन प्रा.हेंमत सर्जे, प्रा.राम किन्हीकर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे एका समारंभाव्दारे विशेष कौतुक केले.