नळदुर्ग -: धायफुले स्पिनींग मिल्स प्रा.लि. चे मालक जगदीश धायफुले यांचे इटकळ (ता. तुळजापूर) ग्रामस्थांसाठी नेहमीच सहकार्य असते. सध्या सर्वत्र तीव्र पाणीटंचाई असून या परिस्थितीत त्यांनी स्पिनींग मिलच्या बाहेर पाण्याचा हौद बांधून त्यामध्ये जनावरांसाठी चोवीस तास पाणी उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे गाव व परिसरातील जनावरे, वन्यप्राणी, पक्षी आपली तहान भागवित आहेत.
तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे गेल्या 25 वर्षापासून धायफुले सुतमिल या ठिकाणी सुरु असून परिसरातील अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिले आहे. जगदीश धायफुले यांनी व्यवसाय न करता विधायक, धार्मिक, सार्वजनिक लोकोपयोगी हिताचे कार्य करीत आहेत. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र तुळजापूरला पायी चालत जाणा-या भाविकांसाठी इटकळ व नळदुर्ग येथे आठवडाभर भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचे वाटप केले जाते. धायफुले यांच्यामुळै गावातील व परिसरातील बेकारांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून त्यांना धन्यवाद दिले जात आहे.