नळदुर्ग -: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, इंदिरानगर बी.आर. ग्रुपच्यावतीने शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी जाहीर व्याख्यान व प्रमुख मान्यवरांचे सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून शिक्षणमहर्षी आलुरे गुरुजी, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई येथील बिल्डर चंद्रकांत डावरे, जि.प. सदस्य दिलीप भालेराव, युवक कॉंग्रेस जिल्हा सचिव भालचंद्र लोखंडे यांची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी सहा वाजता बक्षीस वितरण व नळदुर्ग परिसरातील चळवळीतील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर आठ वाजता मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्या अँड. वैशाली डोळस यांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बी.आर. ग्रुपचे अध्यक्ष सचिन निकंबे, उपाध्यक्ष रुपेश माने, सचिव अमित गायकवाड, जयंती मंडळाचे अध्यक्ष प्रितम बनसोडे, उपाध्यक्ष आतितोष खुने, सचिन गायकवाड यांनी केले आहे.