बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : धर्माधिकारी (रा. बार्शी) यांचा मुलगा मंदार व कामनकर (रा. करमाळा) यांची मुलगी अश्विनी यांचा विवाह येथील प्लाझा मंगल कार्यालयात होत असताना सिमांत पुजनानंतर मुलाने मुलीच्या गळ्यात मंगळसू्त्र घालताना मुलीने लग्नास नकार देत निघून गेली. सदरच्या प्रकारानंतर संपूर्ण व-हाडी मंडळींचा गोंधळ सुरु झाला. मोठा कोलाहल माजला व सदरचे प्रकरण हाताबाहेर जाण्याच्या स्थितीत आले. यानंतर मुलीकडचे व-हाडी यांना तेथून जाण्यास सांगण्यात आले. काही वेळानंतर याच मंडपामध्ये बार्शीतील खेडकर यांच्या मुलीशी विवाह लागला. सदरच्या घटनेनंतर शहरात विविध प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या.